नवी दिल्ली : आशियात कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात (महाराष्ट्र) गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचा भाव दुपटीने वाढत प्रति किलो ४० रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत येथे कांद्याचा भाव प्रति किलो २० रुपये होता. भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रातील उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवण केली आहे. लासलगावात दररोज ५ ते ६ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. तथापि, मागच्या वर्षी याच अवधीत १५ ते १८ हजार क्विंटल आवक झाली होती. कमी उत्पादन आणि जुलै-सप्टेंबर या अवधीतील मागणीची पूर्तता करण्यासाठी कांद्याची साठवणूक करण्यात आल्याने आवक घटलीआहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लासलगावात कांदा महागला
By admin | Updated: August 5, 2015 22:54 IST