Join us  

...अन्यथा कार्ड केले जाणार बंद; नऊपेक्षा जादा सीम कार्ड बाळगणाऱ्यांची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 8:52 AM

दूरसंचारचे आदेश, एका व्यक्तीला ९ सीम कार्ड वापरण्याची परवानगी आहे. जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये ६ सीम कार्ड वापरता येतात.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांकडे एकाहून अधिक माेबाइल सीम कार्ड असल्याचे दिसून येते. मात्र, अशा लाेकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नऊपेक्षा जास्त सीम कार्ड ठेवणाऱ्या ग्राहकांची पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी न झाल्यास सीम कार्ड बंद करण्यात येतील. केंद्रीय दूरसंचार विभागाने याबाबत आदेश दिले आहेत.

एका व्यक्तीला ९ सीम कार्ड वापरण्याची परवानगी आहे. जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये ६ सीम कार्ड वापरता येतात. परवानगीपेक्षा अधिक सीम कार्ड असणाऱ्या ग्राहकांना सेवा सुरू ठेवण्यासाठी इच्छेनुसार सीम कार्ड निवडता येतील. उर्वरित माेबाइल क्रमांक बंद केले जातील. जास्त सीम कार्ड आढळल्यास सर्व सीम कार्डसाठी ग्राहकाची पडताळणी करण्यात येईल.

यामुळे घेतला निर्णयआर्थिक गुन्हे, आपत्तीजनक काॅल्स, ऑटाेमेटेड काॅल्स आणि फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यांचा तपास करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नियमांनुसार वापर हाेत नसलेले सर्व माेबाइल क्रमांक बंद करून ते डेटाबेसमधून हटविण्याचे आदेश सर्व कंपन्यांना देण्यात आले आहेत. यामुळे मोबाइलचा देशविरोधी कारवाया व अवैध धंद्यासाठीचा वापर बंद होईल.