Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख कोटींचा प्राप्तिकर झाला जमा

By admin | Updated: June 22, 2017 01:41 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राप्तिकराद्वारे मिळणाऱ्या महसुलात २६.२ टक्क्यांनी वाढला असून, यंदा १५ जूनपर्यंत १ लाख १ हजार ०२४ कोटी रुपये झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत प्राप्तिकराद्वारे मिळणाऱ्या महसुलात २६.२ टक्क्यांनी वाढला असून, यंदा १५ जूनपर्यंत १ लाख १ हजार ०२४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी जमा झालेल्या प्राप्तिकराची रक्कम ८० हजार ७५ कोटी रुपये इतकी होती. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातून सर्वाधिक महसूल जमा झाला असून, तब्बल १३८ टक्के वाढीसह तो यंदा २२ हजार८८४ कोटी रुपयांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ९ हजार ६१४ कोटी रुपये होती. दिल्ली विभागात ३८ टक्के वाढीसह ११ हजार ५८२ कोटी रुपये इतका प्राप्तिकर यंदा जमा झाला आहे. गेल्या वर्षी या विभागात ८ हजार ३३४ कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. कोलकाता विभागात यंदा ७ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. या विभागात ४,०८४ कोटी रुपये प्राप्तिकर जमा झाला आहे. गतवर्षी ही रक्कम ३ हजार ८१५ कोटी रुपये होती.