नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आर्थिक परिस्थिती चांगली असलेले जवळपास एक कोटी ग्राहक एलपीजी सबसिडी नाकारतील, अशी आशा सरकार बाळगून आहे.बाजारभावाने एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची कुवत असलेल्यांंनी सबसिडी घेऊ नये, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एक कोटींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. बघू या किती लोक एलपीजी सबसिडी नाकारतात? देशभरात १५.३ कोटी एलपीजी ग्राहक आहेत.मागच्या आठवड्यात एका अधिवेशनात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आजवर २.८ लाख लोकांनी एलपीजी सबसिडी सोडून दिली आहे. त्यामुळे १०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. २ लाख ८० हजार लोकांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. या शंभर कोटींचा उपयोग गरिबांच्या कल्याणासाठी करता येईल. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना सुरू केल्याने अनेकांनी सबसिडी नाकारण्याचे ठरविले आहे. अशी माहिती देण्यात आली.(लोकमत न्यूज नेटवर्क)
एक कोटी ग्राहक नाकारतील सबसिडी
By admin | Updated: March 29, 2015 23:29 IST