Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या परदेशी सिगारेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 03:11 IST

डीआरएची कारवाई; एकाला अटक

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरए) पथकाने काळबादेवी येथील चिराबाजारमधील गोदामात सोमवारी छापा टाकून एक कोटी एक लाख रुपये किमतीच्या परदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त केल्या. मणिपुरातून दिल्लीमार्गे ६० बॉक्समधून विविध कंपन्यांच्या तब्बल ६ लाख ७३,१२० सिगारेट तस्करी करून आणण्यात आल्या होत्या.

सिगारेटची तस्करी करण्यात आल्याची माहिती डीआरएच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहआयुक्त समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून चिराबाजारातील गोदामवर छापा टाकला. तेथे ६० बॉक्समध्ये बेन्सन अ‍ॅण्ड हेडिज, गुडग, ग्रॅम, मार्लबो, ५५५, पॅरिस आदी कंपनीच्या सिगारेट होत्या. गोदाम मालक बिपीन सिंग याला न्यायालयाने २५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यात दिल्लीतील टोळी सक्रिय असून सिंग याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :सिगारेटमुंबई