Join us  

मिल्टन कीन्स येथे रंगणार OMPEGचा द्वितीय वर्धापनदिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 7:50 PM

यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये सन २०१६ला  स्थापन केली.

केदार लेले

लंडन :  यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये सन २०१६ला  स्थापन केली.OMPEG (Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group) या संस्थेचा उद्घाटन सोहळा १० एप्रिल २०१६ रोजी लंडन येथिल सडबरी गोल्फ क्लबवर संपन्न झाला होता. तसेच या संस्थेचा पहिला वर्धापनदिन दि. २९ एप्रिल २०१७ रोजी) मोठ्या दिमाखात लॉर्डसवर साजरा करण्यात आला होता!OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन (दि. ७ एप्रिल रोजी) मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम वर साजरा करण्यात येत आहे. सदर लेखात जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या  सोहळ्याबद्दल!OMPEGच्या सोहळ्यासाठी प्रतिष्ठित मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियमचे स्थळ निश्चित!उद्घाटन सोहळ्यास गोल्फ क्लब, पहिल्या वर्धापन दिनी लॉर्डस आणि दुसऱ्या वर्धापन दिनी मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम येथे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे नकळतच क्रीडा संस्कृती आणि OMPEG ची एक आगळी वेगळी नाळ जुळून येत आहे!

हाऊसफुल  कार्यक्रम  साधारण १५० लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे आणि हा कार्यक्रम बघता बघता हाऊसफुल झाला आहे!    OMPEGची वाटचाल अभिमानास्पद अस्तित्वापासून गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत OMPEG शी संबंधित सदस्यांमध्ये आपुलकीची जाणीव आणि एकत्र येऊन खूप काही मिळवावे असा मराठी बाणा दिसून येत आहे. ज्यामुळे अधिकाधिक उद्योजक आणि व्यावसायिक OMPEG मध्ये सहभागी व्हायला पुढे आले आहेत. OMPEGचे सभासदत्व प्रत्येक दिवसागणिक वाढत आहे आणि ही संख्या १५०० पर्यंत वाढवणं हे नवे उद्येश्य उदयास येत आहे!  OMPEGचा मुख्य उद्येश्यप्रताप शिर्के आणि धनंजय मुंगळे यांनी "OMPEG ने सन २०२० पर्यंत २० नवे उद्योग नक्की यशस्वी कराव्या" असे आव्हानात्मक लक्ष्य सुचवले आहे आणिOMPEG त्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे!  OMPEG या संस्थेचे प्रमुख उद्येश्य हे युकेमधील हजारोने पसरलेल्या महाराष्ट्रीयन व्यवसायिक व उद्योजकांना एकत्र आणून नवीन संधी व प्रोत्साहन उपलब्ध करुन देणे तसेच तरुण उद्योजकांना मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे!कार्यक्रमाची जय्यत तयारी! OMPEGच्या संस्थापक सदस्यांबरोबर, इतर सदस्यांनी द्वितीय वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या संयोजन, संकल्पना आणि आयोजनास मदत केली आहे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रयोजकांनी नेहमीप्रमाणे सढळपणाने मदत केली आहे. प्रयोजकांची यादी खालील प्रमाणेप्लॅटिनमश्री. जय तहसीलदार - मर्क्युरिअस आयटीगोल्डश्री. राहुल इथापे - नक्षी.कॉमश्री. अनिल कापरेकर - बॅनियन ट्री आन्सर्सश्री. दिलीप आमडेकर सिल्व्हरसौ. रंजिता दळवी - दळवी वेल्थ मॅनेजमेंटसौ. रेणुका फडके - व्ही आर मॉर्टगेज सोल्युशन्ससौ. माधवी आमडेकर आणि श्री. रवी गाडगीळ - कोलंबस इंटरनॅशनलश्री. अक्षय शहा - एस अकाऊंट्स अँड टॅक्सश्री. मिलिंद कांगले आणि श्री. मार्क  ओलेफसन- टूटूम होमश्री. विजेंद्र इंगळे आणि श्री. विहंग इंगळे - माय मराठीश्री. सुजय सोहनी आणि श्री. सुबोध जोशी - श्रीकृष्ण वडा पावश्री. अमन सिंह - KNAVश्री. संजय रोडे - पायोनियर 

टॅग्स :क्रीडा