Join us

आशियाई बाजारात तेलाचे भाव पडले

By admin | Updated: September 2, 2015 00:07 IST

आशियाच्या बाजारात मंगळवारी तेलाच्या किमती खाली आल्या. जगात तेलाचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमध्ये आॅगस्ट महिन्यात वस्तू उत्पादन आकसल्याचा

सिंगापूर : आशियाच्या बाजारात मंगळवारी तेलाच्या किमती खाली आल्या. जगात तेलाचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमध्ये आॅगस्ट महिन्यात वस्तू उत्पादन आकसल्याचा परिणाम तेल स्वस्त होण्यावर झाला.वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे तेल १.५० अमेरिकन डॉलरने घटून ४७.७० वर, तर ब्रेंटचे कच्चे तेल आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठी १.४६ अमेरिकन डॉलरने स्वस्त होऊन ५२.६९ अमेरिकन डॉलरवर आले. चीनच्या औद्योगिक क्षेत्रात खरेदी व्यवस्थापकांच्या निर्देशांकात घट झाल्यामुळे जगात दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल काळजी व्यक्त होत आहे. तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना ओपेकने चर्चा करण्याची तयारी दाखविली आहे.