Join us

आशियाई बाजारात तेल सहा वर्षांच्या नीचांकावर

By admin | Updated: August 27, 2015 01:23 IST

आशियाच्या बाजारपेठेत बुधवारी तेलाचे भाव सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले. चीनच्या अशक्त अर्थव्यवस्थेमुळे या आठवड्यात शेअर बाजाराला प्रचंड नुकसान सोसावे लागल्यामुळे

सिंगापूर : आशियाच्या बाजारपेठेत बुधवारी तेलाचे भाव सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले. चीनच्या अशक्त अर्थव्यवस्थेमुळे या आठवड्यात शेअर बाजाराला प्रचंड नुकसान सोसावे लागल्यामुळे जी घाबरगुंडी उडाली ती व अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या आलेल्या अहवालाचा हा परिणाम आहे.वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या आॅक्टोबरच्या डिलिव्हरीचे भाव १३ सेंटस्ने खाली येऊन ३९.१८ अमेरिकन डॉलरवर आले, तर बें्रटचे कच्चे तेल आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठी १३ सेंटस्ने स्वस्त होऊन ४३.०८ अमेरिकन डॉलर झाले. तेलाचा अतिरिक्त पुरवठा असताना मागणी कमी होत गेली व २००९ नंतर तेल प्रथमच स्वस्त झाले व परिणामी आॅक्टोबरच्या दोन्ही डिलिव्हरीसाठीची कंत्राटे स्वस्तात झाली. अमेरिकेच्या तेल कंपन्यांनी सतत पुरवठा सुरूच ठेवल्यामुळे तेलाच्या किमती खाली येण्यास त्यांचा परिणाम झाला, असे फिलीप फ्युचर्सचे गुंतवणूक सल्लागार डॅनियल अँग यांनी सांगितले.