सॅन फ्रान्सिस्को : कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती सध्या गडगडलेल्या आहेत; मात्र २०१६ अखेरीस त्या दुप्पट होऊ शकतात, असे तेल क्षेत्रातील अमेरिकी दिग्गज टी. बुुने पीकेन्स यांनी म्हटले आहे. पीकेन्स यांनी यापूर्वी कच्च्या तेलाचे भाव यावर्षीच्या प्रारंभीच दुप्पट होतील, असा अंदाज वर्तविला होता. पीकेन्स यांच्या मते, २०१६ च्या अखेरीस कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १०० डॉलर प्रति बॅरेल होऊ शकते. सध्या ती ४७.४० डॉलर प्रति बॅरेल आहे.
तेलाच्या किमती वाढू शकतात
By admin | Updated: March 25, 2015 23:59 IST