सिंगापूर : आशियाच्या बाजारात गेल्या सोमवारच्या व्यवहारात खाली आलेल्या तेलाच्या किमती मंगळवारी चीन आणि अमेरिकेचे उत्पादन क्षेत्र कमकुवत बनल्यामुळे आणि जागतिक बाजारपेठेत तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याच्या काळजीमुळे वधारल्या.अमेरिकेचे वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे सप्टेंबरच्या डिलिव्हरीचे तेल ३१ सेंटस्ने वधारून ४५.४८ अमेरिकन डॉलरवर, तर ब्रेंटचे कच्चे तेल सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी ३२ सेंटस्ने महाग होऊन ४९.८४ अमेरिकन डॉलर झाले. सोमवारी डब्ल्यूटीआयचे तेल १.९५, तर ब्रेंटचे कच्चे तेल २.६९ अमेरिकन डॉलर घसरले होते.
आशियाच्या बाजारात तेल झाले महाग
By admin | Updated: August 4, 2015 23:10 IST