सिंगापूर : आशियाच्या बाजारात सोमवारी वेस्ट टेक्सासचे तेल ७९ सेंटस्ने, तर ब्रेंटचे कच्चे तेल तब्बल १ अमेरिकन डॉलरने स्वस्त झाले. या घसरणीनंतर आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे वेस्ट टेक्सासचे तेल ४४.४३ तर बे्रंचचे तेल ४९.०५ अमेरिकन डॉलरवर आले. डीलर्सनी आधीच्या सत्रात मोठा नफा कमावला व त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा रागरंग व तेलाची तेथे कितपत मागणी आहे हे बघताच तेलाच्या भावांवर दडपण आले व भाव खाली आले. चीनच्या अडखळत्या अर्थव्यवस्थेच्या काळजीतून तेलाच्या किमती खाली आल्यानंतर शुक्रवारी वेस्टचे तेल गेल्या साडेचार वर्षांत प्रथमच २.६६ अमेरिकन डॉलर्सनी (६.३ टक्के) तर ब्रेंटचा भाव २.४९ अमेरिकन डॉलर्सनी (५.२ टक्के) उसळला. ही उसळण अमेरिकन अर्थव्यवस्था आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये २.३ टक्क्यांची अपेक्षा व्यक्त झाली असताना ३.७ टक्क्यांनी वधारली. कारण जगातील सर्वात जास्त तेलाचा वापर करणाऱ्या या देशात तेलाची मागणी वाढेल अशी आशा निर्माण झाली होती.तेलाच्या किमती गेल्या साडेसहा वर्षांच्या नीचांकावरून एकदम वर आल्या. तथापि, येमेनमधील परिस्थिती आणि अमेरिकेतील वस्तू उत्पादन व बेरोजगारीच्या आकडेवारीचा येत्या आठवड्यांत तेलाच्या किमतीवर प्रभाव पडेल, असे अशिया पॅसिफिक आॅईल अँड गॅसचे सल्लागार संजीव गुप्ता यांनी म्हटले.
आशियाई बाजारात तेल आणखी स्वस्त
By admin | Updated: August 31, 2015 22:34 IST