सिंगापूर : चीनच्या शेअर बाजारात सोमवारी एकदम घसरण होताच मंगळवारी तेलाचे भाव आशियाच्या बाजारपेठेत आणखी खाली आले. तेलाचा पुरवठा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.अमेरिकन कंपनी वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या सप्टेंबरच्या डिलिव्हरीचा भाव ४३ सेंटस्ने घसरून ४६.९८ अमेरिकन डॉलरवर आला. ब्रेंटचे कच्चे तेल सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी ५५ सेंटस्ने घसरून ५२.९२ अमेरिकन डॉलरवर आले. या दोन्ही तेलांचे भाव सोमवारी स्वस्तच होते. शांघायचा शेअर बाजार सोमवारी ८.४८ टक्क्यांनी खाली आला होता. ही त्याची गेल्या आठ वर्षांतील सगळ्यात मोठी घसरण होती. बाजाराची आणखी घसरण होऊ नये म्हणून चीनने या महिन्याच्या सुरुवातीपासून मदतीची उपाययोजना राबविली होती. हा पाठिंबा सरकार काढून घेणार या काळजीने शेअर बाजार घसरला होता. तोट्याचा हा कल सरकारने मदत काढून घेतली जाणार नाही असे सांगितल्यानंतरही दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला व बाजार सकाळी ४ टक्क्यांनी घसरला. चीनचा बाजार असा घसरल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी भीती व्यक्त झाली व त्या भीतीचे पडसाद तेलाच्या किमती स्वस्त होण्यात झाल्या, असे येथील फिलीप फ्युचर्सचे गुंतवणूक विश्लेषक डॅनियल अँग यांनी सांगितले. चीनचा शेअर बाजार नेमका कोणत्या दिशेने जातो हे आम्हाला बारकाईने बघावे लागेल, असे ते म्हणाले.
आशियाच्या बाजारात तेल दुसऱ्या दिवशीही उतरले
By admin | Updated: July 29, 2015 02:50 IST