Join us  

GST: ऑक्टोबर हिट! झाले दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन, आकडा पाहून म्हणाल... 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 6:01 AM

१.३० लाख काेटी रुपये झाले जमा : जनतेमध्ये खरेदीचा उत्साह

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम आणि बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणाचा वस्तू आणि सेवा कर संकलनावर चांगला परिणाम झाला आहे. सलग चार महिने जीएसटी संकलन एक लाख काेटी रुपयांहून अधिक आहे. ऑक्टाेबरमध्ये तब्बल १ लाख ३० हजार काेटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटी लागू करण्यात आल्यापासून हे दुसरे सर्वाेच्च मासिक कर संकलन आहे.

अर्थमंत्रालयाने ऑक्टाेबरमधील जीएसटी संकलनाचे आकडे जाहीर केले. ऑक्टाेबरमध्ये १ लाख ३० हजार १२७ काेटी रुपयांचे संकलन झाले आहे. त्यात सीजीएसटी २३ हजार ८६१ रुपये, एसजीएसटी ३० हजार ४२१ काेटी, आयजीएसटी ६७ हजार ३६१ काेटी आणि उपकर ८ हजार ४८४ काेटी रुपयांचा समावेश आहे. आयात वस्तूंवर जमा असलेल्या ३२ हजार ९९८ काेटी रुपयांचाही आयजीएसटीमध्ये समावेश आहे. 

वाहन विक्री घटल्याचा परिणामnगेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टाेबरच्या जीएसटी संकलनात २४ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. ऑटाेमाेबाईल क्षेत्रातील विक्रीवर परिणाम झाला नसता तर जीएसटी संकलनात आणखी वाढ झाली असती, असेही अर्थ मंत्रालयाने म्हटले.nएप्रिल २०२१ मध्ये १ लाख ४१ हजार ३८४ काेटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वाेच्च जीएसटी संकलन झाले हाेते. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे मे आणि जून महिन्यात जीएसटी संकलनात घट झाली हाेती.गेल्या चार महिन्यातील संकलन (काेटीं रुपयांमध्ये)nजून- ९२ हजार ८४९ nजुलै- १ लाख १६ हजार ३९३nऑगस्ट- १ लाख १२ हजार २०nसप्टेंबर- १ लाख १७ हजार १०

दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरलाnकाेराेनाच्या दुसऱ्या लाेटेचा प्रभाव ओसरला आहे. आर्थिक सुधारणा हाेत असल्याचे जीएसटी संकलनाचे आकडेवारीतून दिसत आहे. प्रत्येक महिन्यातील ई-वे बिलांच्या माध्यमातूनही ही बाब अधाेरेखित हाेत असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. 

टॅग्स :जीएसटी