Join us  

आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलर एफडीआय आणण्याचे उद्दिष्ट -प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 6:24 AM

आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्याचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आगामी दोन वर्षांत १०० अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणण्याचे उद्दिष्ट भारताने निर्धारित केले आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यास जपान, दक्षिण कोरिया, चीन व रशिया यासारख्या देशांसाठी विशेष औद्योगिक समूह तयार करणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.प्रभू यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, यासाठी कंपन्या, क्षेत्रे आणि देश आम्ही ठरविले आहेत. आता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही रोड शो करणार आहोत. २०१९ मध्ये भारत हा विदेशी गुंतवणुकीचे सर्वोच्च ठिकाणराहील.प्रभू यांनी म्हटले की, जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया यासारख्या देशांसाठी आम्ही औद्योगिक समूह निर्माण करीत आहोत. या देशांतील कंपन्या या समूहांत गुंतवणूक आणि परिचालन करतील. भारतात औद्योगिक पार्क उभारण्यास चीनने मान्य केले आहे. भारतात कारखाने उभारण्यास तयार असलेल्या कंपन्यांची यादी देण्यास चीनला सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे युरो आणि अमेरिका येथील ज्या कंपन्या भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यास तयार आहेत, त्यांचे स्वागत करायलाही भारताला आनंद होईल. त्यांना विशेष दर्जा दिला जाईल.२०१८ मध्ये भारत सरकारने एफडीआयविषयक नियममोठ्या प्रमाणात शिथिल केलेआहेत. जागतिक बँकेने जारीकेलेल्या व्यवसाय करण्याससुलभ असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सुधारून ७७झाला आहे. आधी तो १३०होता.

टॅग्स :परकीय गुंतवणूकसुरेश प्रभू