Join us

फोनधारकांची संख्या १00 कोटींच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: June 18, 2015 02:06 IST

देशात टेलिफोनधारकांची संख्या गेल्या एप्रिलमध्ये किरकोळ वाढून ९९.९७ कोटी झाली आहे. मोबाईल हँडसेटच्या वाढत्या वापरामुळे ही संख्या वाढली आहे.

नवी दिल्ली : देशात टेलिफोनधारकांची संख्या गेल्या एप्रिलमध्ये किरकोळ वाढून ९९.९७ कोटी झाली आहे. मोबाईल हँडसेटच्या वाढत्या वापरामुळे ही संख्या वाढली आहे.दूरसंचार नियामक व विकास प्राधिकरणने (ट्राय) दिलेल्या माहितीनुसार गेल्या मार्चअखेर टेलिफोनधारक ९९.६५ कोटी होते. ट्रायने निवेदनात म्हटले आहे की, शहरी भागात ग्राहकांची संख्या वाढून ५८.०१ कोटी झाली. मार्च २०१५ मध्ये ती ५७.७२ कोटी होती. गावांमध्ये ही संख्या ४१.९३ कोटींहून वाढून ४१.९६ कोटी झाली. एप्रिलमध्ये मोबाईल हँडसेट ग्राहकांची संख्या ९७.३३ कोटी झाली ती मार्चअखेर ९६.९९ कोटी होती. लँडलाईन ग्राहकांची संख्या सतत घटत आहे. गेल्या एप्रिलमध्ये ही संख्या कमी होऊन २.६४ कोटी झाली ती मार्चअखेर २.६६ कोटी होती.मोबाईल कनेक्शन (वायरलेस) घनता ७७.२७ टक्क्यांनी वाढून ७७.४६ टक्क्यांवर गेले व लँडलाईन (वायरलाईन) घनता कमी होऊन एप्रिलमध्ये २.१० टक्क्यांवर आली. ती मार्चअखेर २.१२ टक्के होती. ३० एप्रिल २०१५ अखेर मोबाईल हँडसेट क्षेत्रात खासगी कंपन्यांचा वाटा ९१.६५ टक्के होता व बीएसएनएल व महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचा (एमटीएनएल) वाटा ८.३५ टक्के होता. एप्रिलमध्ये मोबाईल क्षेत्रात सगळ्यात जास्त वृद्धी हिमाचल प्रदेशात झाली.