Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी खातेधारकांची संख्या वाढली

By admin | Updated: March 13, 2016 21:02 IST

प्रधानमंत्री जनधन योजनेतहत (पीएमजेडीवाय) दुहेरी खातेधारकांची संख्या सतत वाढत असून, त्यापूर्वीची २८ टक्के खाती निष्क्रिय आहेत

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनधन योजनेतहत (पीएमजेडीवाय) दुहेरी खातेधारकांची संख्या सतत वाढत असून, त्यापूर्वीची २८ टक्के खाती निष्क्रिय आहेत. वित्तीय सल्लागार कंपनी मायक्रोसेव्हच्या एका सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.हे सर्वेक्षण १७ राज्ये, एक केंद्रशासित प्रदेश यांच्यासह ४२ जिल्ह्यांत करण्यात आले. हे खाते केवळ सरकारी लाभासाठी (सबसिडी) आहे, असा गैरसमज निर्माण झाल्याने खात्यांचे दुहेरीकरण वाढल्याचे त्यात दिसून आले आहे. जवळपास ३३ टक्के ग्राहकांनी त्यांचे हे पहिले बँक खाते नसल्याचे सांगितले.