नवी दिल्ली : यंदा आतापर्यंत समभाग उलाढालीच्या दृष्टीने जगातील प्रमुख बाजारांत अमेरिकेतील नास्डॅक ओएमएक्स प्रथम, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड फेडरेशन आॅफ एक्स्चेंजने यासंदर्भातील आकडेवारीचे विश्लेषण प्रसिद्ध केले आहे.गेल्या वर्षी जानेवारी ते आॅक्टोबर याच काळात यादृष्टीने एनएसई प्रथम स्थानी होती. जानेवारी-आॅक्टोबर २०१४ मध्ये नास्डॅक ओएमएक्समध्ये १४४.२ कोटी रुपयांची उलाढाल राहिली. ५२ बाजारात नास्डॅक प्रथम क्रमांकावर आहे. यादरम्यान एनएसईत १४१.७४ कोटी रुपयांची समभाग उलाढाल झाली. मुंबई शेअर बाजार आठव्या स्थानी आहे.केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर जागतिक परिस्थितीतही बदल झाला आहे. मंदी दुर होत आहे. त्याचप्रमाणे खनिज तेल्याच्या किमतीही उतरल्या आहेत. यासर्व बाबी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक आहेत.
एनएसईने पटकावले जगात दुसरे स्थान
By admin | Updated: November 17, 2014 03:15 IST