Join us
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बँकांचा एनपीए पोलाद उद्योगामुळे वाढला

By admin | Updated: October 10, 2014 03:54 IST

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात वाढ होत असून पोलाद उद्योगाचा यात मोठा वाटा आहे. बँकांच्या आर्थिक आरोग्यावर या बुडीत कर्जाचा विपरीत परिणाम

नबीन सिन्हा, नवी दिल्लीसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात वाढ होत असून पोलाद उद्योगाचा यात मोठा वाटा आहे. बँकांच्या आर्थिक आरोग्यावर या बुडीत कर्जाचा विपरीत परिणाम होत असून लोखंड आणि पोलाद उद्योगामुळे हे कर्ज ५३.५४ हजार कोटी झाले आहे.असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (असोचेम) गुरुवारी येथे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, वेगवेगळे फेररचित बँक कर्ज २.५ लाख कोटी रुपये असून ते देशातील विविध उद्योगांमुळे झाले आहे. गेल्या वर्षी हेच कर्ज १.६८ लाख कोटी रुपये होते. या सगळ्या कर्जाची तपासणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सीडीआर शाखेने केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ज्या ४१५ कंपन्यांना कर्जाची फेररचना करून दिली, त्यात कोअर इन्फ्रास्ट्रक्चरमधील १३४ कंपन्यांचा समावेश आहे, असे अहवालाने म्हटले आहे. बुडीत कर्ज असलेल्या लोखंड आणि पोलाद कंपन्यांची संख्या या आर्थिक वर्षात ३४ वरून ६१ झाली आहे. बुडीत कर्जाचा ठपका आलेल्या इतर कंपन्या अशा- वीज-२८, वस्त्रोद्योग- ७६, पायाभूत-२४, दूरसंचार- ११, कागद-२४, सिमेंट-११ आणि खाण-८. खाणपट्टे वाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा परिणाम अशा कर्जावर होईल असे अहवाल म्हणतो.