नवी दिल्ली : भारतातील बँकांच्या थकीत कर्जाचा (एनपीए) आकडा ३,००,६११ कोटींवर पोहोचला आहे. मंजुरीअभावी प्रकल्प रखडणे, देशांतर्गत आर्थिक वृद्धीची मंदावलेली गती आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे थकबाकी वाढली आहे, असे केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत सांगितले.डिसेंबर २०१४ च्या आकडेवारीनुसार या एकूण थकबाकीत राष्ट्रीयीकृत बँकांचे २,६२,४०२ कोटी आहेत, तर खाजगी क्षेत्रातील बँकांचे ३८,२०९ कोटी थकीत आहेत. थकीत कर्जवसुलीसाठी रिझर्व्ह बँकेने अनेक उपाय योजले आहेत. वसुलीकडे जाणूनबुजून कर्मचारी डोळेझाक करीत असल्याचे लक्षात आल्यास बँका संबंधित कर्मचाऱ्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार कारवाई करू शकतात.
बँकांचा एनपीए ३,००,६११ कोटी
By admin | Updated: March 13, 2015 23:39 IST