Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सहा महिन्यांत २५ टक्के एनपीए वसूल होईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:01 IST

नीरव मोदीच्या १३ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ सुनील मेहता यांनी बँकेच्या ८० हजार कोटींच्या अनुत्पादक भांडवलापैकी २५ टक्के रक्कम येत्या सहा महिन्यांत वसूल होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

नवी दिल्ली - नीरव मोदीच्या १३ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ सुनील मेहता यांनी बँकेच्या ८० हजार कोटींच्या अनुत्पादक भांडवलापैकी २५ टक्के रक्कम येत्या सहा महिन्यांत वसूल होण्याची अपेक्षा व्यक्त केली.मेहता म्हणाले की, भूतकाळातील वैभव पुन्हा मिळविण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. पण या काळात बँकेची कामगिरी चांंगली आहे. आम्ही १,१०० कोटी नफा कमावला, काही भांडवल उभारले आहे, गृह शाखेचे समभाग विकले आहेत, सरकारकडूनही काही रक्कम मिळाली आहे. साधारणत: १२ हजार कोटी आम्हाला मिळाले आहेत.ते म्हणाले की, आमचा एनपीए ५७ हजार कोटी असून, २५ हजार कोटी आम्ही कर्जमाफीत गमावले आहेत. त्यामुळे एनपीए ८० हजार कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र तीन ते सहा महिन्यांत आम्ही पुन्हा झेप घेऊ.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळापंजाब नॅशनल बँकबँकिंग क्षेत्र