Join us

आता महिन्यातून एकदाच भरा जीएसटी रिटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:46 IST

ग्राहकांनी खरेदी डिजिटल पेमेंटने केल्यास त्यांना १०० रुपयांपर्यंतचा इन्सेटिव्ह देण्याच्या विचार जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी अमान्य केला. आता यापुढे महिन्याला एकदाच जीएसटी रिटर्न सादर करावा लागणार आहे.

 नवी दिल्ली - ग्राहकांनी खरेदी डिजिटल पेमेंटने केल्यास त्यांना १०० रुपयांपर्यंतचा इन्सेटिव्ह देण्याच्या विचार जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी अमान्य केला. आता यापुढे महिन्याला एकदाच जीएसटी रिटर्न सादर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे साखरेवर सेस लागू करण्याच्या प्रस्तावाला होकार न देता जीएसटी कौन्सिलने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीकडे हा प्रश्न सोपविण्यात आला आहे.जीएसटी कौन्सिलची शुक्रवारी २७ वी बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, सध्या दर महिन्याला एकापेक्षा जास्त वेळा जीएसटी परतावा सादर करावा लागतो. त्याऐवजी महिन्यातून एकदाच हा परतावा सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

टॅग्स :जीएसटीअर्थव्यवस्था