Join us

आता JIO सिम कार्डची होम डिलीवरी

By admin | Updated: September 28, 2016 21:01 IST

सिमकार्ड घेण्यासाठी आता ग्राहकांना जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही कारण लवकरच रिलायन्सकडून जिओ सिमकार्डची होम डिलीवरी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - रिलायन्स जिओ सिमकार्डला सध्या मोठी मागणी आहे. मात्र, ग्राहकांना सिमकार्ड घेण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. सिमकार्ड घेण्यासाठी आता ग्राहकांना जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही कारण लवकरच रिलायन्सकडून जिओ सिमकार्डची होम डिलीवरी केली जाणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. 
 
सिमकार्ड ऑर्डर केल्याच्या 5 ते 7 दिवसात सिम ग्राहकांना घरपोच मिळणार आहे. अजूनपर्यंत ही सेवा सुरू झालेली नाही पण याची चाचपणी सुरू असून लवकरच सेवा सुरू करण्याचा रिलायन्सचा विचार आहे. 
 
रिलायन्सने गेल्या महिन्यात जिओ 4जी सेवा लॉन्च केली होती. यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना मर्यादित मोफत कॉल्स आणि 4जी डेटा दिला जाणार आहे.