नवी दिल्ली : स्टार्ट-अप कंपनी दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीने देवनागरी लिपित ई-मेल देण्याची सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा मोफत नाही. तथापि, ती लवकरच मोफत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.ही सेवा मोफत सुरू झाल्यास भारतात जी-मेल, आऊटलूक आणि याहू या कंपन्यांच्या ई-मेल आयडी सेवांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. हिंदी, मराठी, नेपाळी आदी अनेक प्रमुख भारतीय भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. या भाषा वापरणारे लोक देवनागरी ई-मेल आयडीला पसंती देऊ शकतात. दाता एक्सजेन टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक अजय दाता यांनी सांगितले की, शे-दोनशे आयडी आतापर्यंत तयार करण्यात आले आहेत. ‘डॉट भारत’ या डोमेनवर ते आहेत. आमच्या वेबसाईटवर जाऊन कोणीही देवनागरीतील ई-मेल आयडी विकत घेऊ शकतो. या वेब पत्त्यावरून पाठवलेले मेल जी-मेल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांच्या सेवा यंत्रणांमध्ये स्वीकारले जात आहेत. नेटवर हिंदी देवनागरीची सोय यापूर्वीच झाली आहे. आता देवनागरी लिपीत ई-मेल अॅड्रेस तयार करण्याची सोय आम्ही दिली आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने घेतलेल्या एका बैठकीत गुगल आणि मायक्रोसॉफ्टया कंपन्यांनी देवनागरी ई-मेल आयडी स्वीकारण्याचे मान्य केले आहे. (वृत्तसंस्था)>युनिकोडमुळे गैरसोय दूर झालीभारतात २५ वर्षांपूर्वी इंटरनेट आले, तेव्हा केवळ इंग्रजी लिपीतच ते उपलब्ध होते. त्यामुळे लोक मराठी, हिंदी या भारतीय भाषा इंग्रजीची लिपी वापरून लिहीत असत. युनिकोडच्या विकासानंतर ही गैरसोय दूर झाली.
आता मराठीतही ई-मेल आयडी
By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST