Join us  

...आता चंदा कोचर व कुटुंबीय अमेरिकन संस्थेच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 6:26 PM

आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या बँकेच्या कथित दुर्लक्षाच्या प्रकरणांची अनेक पातळ्यांवर चौकशी सुरू असतानाच या प्रकरणांचा आता अमेरिकेचे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनदेखील (एसईसी) तपास करणार आहे.

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या बँकेच्या कथित दुर्लक्षाच्या प्रकरणांची अनेक पातळ्यांवर चौकशी सुरू असतानाच या प्रकरणांचा आता अमेरिकेचे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनदेखील (एसईसी) तपास करणार आहे.चंदा कोचर प्रकरणात भारतीय नियामक आणि तपास संस्था मॉरिशससह विदेशातील तपास यंत्रणांची मदत घेण्याचाही विचार करीत आहेत. विदेशातील तपास यंत्रणाही स्वत: तपास करीत आहेत. आयसीआयसीआय आणि चंदा कोचर यांच्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाबद्दल विचारले असता एसईसीच्या प्रवक्त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. आयसीआयसीआय बँकेला पाठवलेल्या प्रश्नांनाही उत्तर मिळालेले नाही. काही ठराविक कर्जदारांशी चंदा कोचर यांनी केलेल्या व्यवहारात हितसंबंधांचा झालेला संघर्ष आणि उपकराची परतफेड या झालेल्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी बँकेने आधीच सुरू केलेली आहे.गेल्या मार्च महिन्यात या बँकेतील कथित चुकीच्या गोष्टींची वृत्ते प्रसिद्ध झाली होती व तेव्हा बँकेने चंदा कोचर यांच्यावर आमच्या मंडळाचा पूर्ण विश्वास असून आम्ही पुन्हा त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहोत, असे म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीआयसीआयची अमेरिकेत नोंद असल्यामुळे एसईसी या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करीत आहे व एसईसी भारतातील सेबीकडून (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) आणखी तपशील मागवू शकेल. सेबीने आधीच आयसीआयसीआय आणि चंदा कोचर यांना कारणे दाखवा नोटीस आपल्या तपासाचा भाग म्हणून पाठवली आहे.

टॅग्स :चंदा कोचर