Join us  

OLA चे मोठे पाऊल! १० हजार महिला बनवणार ई-स्कूटर; ठरणार जगातील सर्वांत मोठा कारखाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 9:47 AM

कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. 

नवी दिल्ली : देशात ई-स्कूटर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कंपन्यांनी ई-स्कूटर्स बाजारात आणल्या आहेत. त्यात ‘ओला’ने एक माेठे पाऊल उचलले आहे. कंपनीचा जगातील सर्वात माेठा ई-स्कूटर उत्पादनाचा कारखाना भारतात राहणार असून ताे केवळ महिलाच चालविणार आहेत. कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. 

ओला’ने नुकतीच ई-स्कूटर सादर केली हाेती. त्याच्या ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला हाेता. कंपनीचा तामिळनाडूमध्ये सर्वात माेठा कारखाना असून ताे केवळ महिलाच चालविणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. या ठिकाणी १० हजारांहून अधिक महिला काम करणार आहेत. त्यापैकी पहिल्या तुकडीचे अग्रवाल यांनी एक व्हिडिओ शेअर करून स्वागत केले. 

टॅग्स :ओला