Join us

२५ शहरांतील ६00 सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: November 12, 2016 01:54 IST

उत्पादन शुल्क विभागाने देशातील २५ प्रमुख शहरांतील ६00पेक्षा अधिक सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, सोने व मौल्यवान खड्यांच्या विक्रीचा तपशील मागितला आहे.

नवी दिल्ली : उत्पादन शुल्क विभागाने देशातील २५ प्रमुख शहरांतील ६00पेक्षा अधिक सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, सोने व मौल्यवान खड्यांच्या विक्रीचा तपशील मागितला आहे.सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सोन्याच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वित्त मंत्रालयाच्या कक्षेत काम करणाऱ्या केंद्रीय उत्पादन शुल्क माहिती महासंचालनालयाने सराफा व्यापाऱ्यांना या नोटिसा बजावल्या आहेत. ७ नोव्हेंबरनंतरच्या चार दिवसांत विक्री झालेल्या सोन्याचा तपशील त्यांच्याकडे मागण्यात आला आहे. सोन्याचा उपलब्ध साठा आणि विक्री अशी दोन्हींची माहिती देण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत.दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, विजयवाडा, नासिक, लखनौ अशा शहरांतील व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)