Join us
Daily Top 2Weekly Top 5

किमान अर्धा डझन भारतीयांना पनामा पेपर्सप्रकरणी प्राप्तिकराच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 04:52 IST

नवी दिल्ली : पनामा पेपर्सच्या चौकशीला प्राप्तिकर विभागाने वेग दिला आहे. विदेशांमध्ये साठवून ठेवलेल्या बेकायदा संपत्तीचे मूल्यमापन नव्याने सुरू केले असून, किमान अर्धा डझन भारतीयांवर नव्या काळ्या पैशाविरोधी कायद्याखाली नोटिसा बजावल्या आहेत.

नवी दिल्ली : पनामा पेपर्सच्या चौकशीला प्राप्तिकर विभागाने वेग दिला आहे. विदेशांमध्ये साठवून ठेवलेल्या बेकायदा संपत्तीचे मूल्यमापन नव्याने सुरू केले असून, किमान अर्धा डझन भारतीयांवर नव्या काळ्या पैशाविरोधी कायद्याखाली नोटिसा बजावल्या आहेत.आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात जणांनी व संस्थांनी विदेशांत पैसा दडवून ठेवल्याचे व त्यांची मालमत्ता असल्याचे विभागाने शोधून काढले आहे. हे लोक आणि संस्थांच्या उत्पन्नाचे नव्याने फेरमूल्यांकन व नव्याने मूल्यांकन लवकरच सुरू केले जाईल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.या लोकांनी त्यांच्या विदेशातील मालमत्ता आयकर विभागाला तसेच बँक अधिकाºयांनाही सांगितल्याच नाहीत. नव्या काळ्या पैशाविरोधी कायद्याखाली अशी प्रथमच चौकशी होत आहे. यापूर्वी विदेशातील बेकायदा संपत्तीची चौकशी १९६१ च्या दिवाणी आयकर कायद्याखाली केली जायची.

टॅग्स :इन्कम टॅक्स