Join us  

Ambani, Adani: केवळ अदानीच नव्हे, अंबानी अन् दमानींचीही दमछाक! बघा, २ महिन्यांत किती अब्ज संपत्ती घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 2:37 PM

Indian Billionaires Net Worth: २० पैकी १४ भारतीय अब्जाधीशांनी गमावले एकूण $९८ अब्ज

Indian Billionaires Net Worth: संपूर्ण जगात मंदीचे सावट असल्याची चर्चा आहे. तशातच 2023 ची सुरुवात भारतीय अब्जाधीशांसाठी काही खास राहिलेली नाही. गौतम अदानी ते मुकेश अंबानी आणि राधाकिशन दमानी यांच्यापर्यंतच्या साऱ्यांचीच दोन महिन्यांत 'नेट व'र्थमध्ये मोठी घसरण झाली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार, काही अब्जाधीशांचे सुमारे $83 अब्ज बुडाले आहेत. तर दुसरीकडे राधाकिशन दमानी यांनीही अडीच अब्ज डॉलर्सहून अधिकचे नुकसान सोसले आहे.

अब्जाधीशांचे आर्थिक नुकसान

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना या वर्षीच्या सुरूवातीपासूनच आर्थिक फटका सोसावा लागला आहे. त्यांनी दोन महिन्यांत तब्बल $6 अब्जपेक्षा जास्त संपत्ती गमावली आहे. विशेष बाब म्हणजे ब्लूमबर्गमध्ये समाविष्ट असलेल्या २० भारतीय अब्जाधीशांपैकी १४ जणांनी त्यांच्या एकूण संपत्तीतून $98 अब्ज गमावले आहेत. केवळ ६ भारतीय अब्जाधीश असे आहेत, ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

गौतम अदानींना बसला सर्वात मोठा फटका

जानेवारी महिन्यात गौतम अदानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती होते. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ११९ अब्ज डॉलर्स होती. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलरवर पोहोचली होती. हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आला. ज्यामध्ये फसवणूक आणि शेअर्समध्ये हेराफेरीचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले. एकूण १० कंपन्यांपैकी ५ कंपन्या अशा आहेत ज्यांचे मूल्यांकन ५० टक्क्यांहून अधिक घसरले आहे. तर ३ कंपन्या अशा आहेत ज्यांचे शेअर्स ७५ टक्क्यांहून अधिक बुडाले आहेत. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ३७.७ अब्ज डॉलर्सवर इतकी खाली आली आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ८२.८ अब्ज डॉलरने घसरली असून सध्या ते जगातील ३२वे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.

मुकेश अंबानींचे ६ अब्ज डॉलर्सचं नुकसान

मुकेश अंबानींसाठी चालू वर्ष खास राहिलेले नाही. मंगळवारी त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये १.२५ टक्क्यांहून अधिक घसरण होत आहे. याचा अर्थ या वर्षी रिलायन्सच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. याशिवाय, नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स (14.21 टक्क्यांनी खाली), हॅथवे केबल अँड डेटाकॉम (14.20 टक्क्यांनी खाली) आणि डेन नेटवर्क्स (14.47 टक्क्यांनी खाली) या रिलायन्स कंपन्यांचे शेअर्स या वर्षी दुहेरी अंकात घसरले. त्यामुळे त्यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. या वर्षी, त्याच्या एकूण संपत्तीमध्ये $6 अब्ज पेक्षा जास्त तोटा झाला आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ८१.१ अब्ज डॉलरवर आली. आता ते जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.

राधाकिशन दमानी यांनाही बसला मोठा फटका

अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स या वर्षी आतापर्यंत १४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. दमानी आणि त्यांच्या कुटुंबासह ग्रुपकडे ३१ डिसेंबरपर्यंत एव्हेन्यू सुपरमार्ट्समध्ये ७४.९९% हिस्सा होता. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचा इक्विटी पोर्टफोलिओ १.८४ लाख कोटी रुपये होता. सध्या व्हीएसटी इंडस्ट्रीज (3.92 टक्क्यांनी खाली), इंडिया सिमेंट्स (14.97 टक्क्यांनी खाली), ट्रेंट (3 टक्क्यांनी खाली) आणि सुंदरम फायनान्स (फ्लॅट) हे इतर काही कंपनीचे समभाग आहेत. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती यावर्षी २.५० अब्ज डॉलर्सनी घसरली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती $16.8 अब्ज असून ते जगातील 98 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.

'या' भारतीय अब्जाधीशांचे मोठे नुकसान

गौतम अदानी- 82.2मुकेश अंबानी- 6.02राधाकिशन दमानी- 2.53कुमार बिर्ला- 1.07अजीम प्रेमजी- 0.871सुनील मित्तल- 0.712अश्विन दनी अँड फॅमिली-    0.658दीलिप संघवी- 0.654महेंद्र चोकसी एंड फैमिली- 0.631केपी सिंह- 0.573उदय कोटक- 0.525रवि जयपुरिया- 0.475सावित्रि जिंदाल- 0.409विक्रम लाल- 0.139

टॅग्स :व्यवसायगौतम अदानीमुकेश अंबानी