Join us

गप्प बसणार नाही, संपणार तर मुळीच नाही

By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST

- भुजबळ यांचा विरोधकांना इशारा

- भुजबळ यांचा विरोधकांना इशारा

नांदेड : माझ्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांमध्ये मी स्वत: एक रुपयाही कुणाला दिलेला नाही़ मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रत्येक निर्णयावर मंजुरी झाली. सर्व प्रकरणाचे दूध का दूध आणि पाणी का पाणी करुन दाखवेन.मी आता गप्प बसणार नाही अन् संपणार तर मुळीच नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांना इशारा दिला़
भुजबळ म्हणाले, भाजपाच्या एका खासदाराने कुठून तरी, काही कागदं आणली आणि माझ्यावर भ्रष्टाचाराचे सुसाट आरोप सुरू केले. १०० कोटींच्या कामात हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणे़ या सर्व प्रकारांशी माझा काहीही संबध नाही, असे ते म्हणाले. नाशिकला इंडिया बुल्सकडून प्रायोजकत्व घेतले म्हणून भ्रष्टाचाराचा आरोप झाला. राज्य सरकारही अनेक कार्यक्रमांसाठी प्रायोजकत्व घेते़ मग त्यांनीही भ्रष्टाचार केला असे म्हणता येईल का? या आरोपांमुळे बदनामी, मनस्तापाचे दुष्टचक्र सुरु झाले आहे़ परंतु मी सर्वांना तोंड देणार आहे, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)