Join us  

नोटाबंदी : १.१६ लाख जणांना आयटीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 1:02 AM

नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली.ज्यांनी मोठ्या रकमा आणि विवरणपत्र असे दोन्ही भरले त्यांचीही कसून छाननी सुरू आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर २.५ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाºया १८ लाख नागरिकांचा तपास करण्यात आला आहे, असेही चंद्रा यांनी सांगितले.चंद्रा म्हणाले की, मोठ्या रकमा भरणा-या नागरिकांची दोन गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणारे आणि १० ते २५ लाख रुपये यादरम्यान रक्कम भरणारे, अशी ही वर्गवारी आहे. २५ लाखांपेक्षा जास्त रक्कम भरूनही विरणपत्र न भरणाºयांची संख्या १.१६ लाख आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ३० दिवसांच्या आत विवरणपत्रे भरण्यास सांगण्यात आले आहे. १० ते २५ लाख यादरम्यान रकमा भरणाºयांची संख्या २.४ लाख असून, त्यांनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत. या लोकांना आयकर कायद्याच्या कलम १४२ (१) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.किती प्रकरणे आहेत संशयास्पद?अधिकृत आकडेवारीनुसार, नोटाबंदीच्या काळात १७.७३ लाख संशयास्पद प्रकरणे आढळून आली. यात २३.२२ लाख बँक खात्यांमध्ये ३.६८ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आयकर विभागाने पाठविलेल्या आॅनलाइन नोटिसांना ११.८ लाख लोकांनी उत्तरे पाठविली आहेत. या लोकांची १६.९२ लाख बँक खाती आयकर विभागाला सापडली आहेत.आयकर कायद्याचा भंग केल्याच्या आरोपाखाली एप्रिल ते सप्टेंबर या काळात ६०९ लोकांवर खटले भरण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या काळात फक्त २८८ लोकांवर खटले भरण्यात आले होते. गेल्या वर्षी ६५२ लोकांविरुद्ध १,०४६ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या १३ वर्षांत शिक्षा झालेल्या लोकांची संख्या ४३ झाली आहे.- सुशील चंद्रा, चेअरमन, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड

टॅग्स :नोटाबंदीइन्कम टॅक्सभारत