Join us

जागतिक मंदीचे संकेत नाहीत -मुडीज

By admin | Updated: March 8, 2016 23:31 IST

कच्च्या तेलाच्या भावातील घसरण आणि चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर जरूर परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या भावातील घसरण आणि चीनच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावत असल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर जरूर परिणाम झाला आहे. तथापि, हे काही जागतिक मंदीचे संकेत नाहीत, असे मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या जागतिक मानांकन संस्थेने स्पष्ट केले आहे.जागतिक वृद्धीची जोखीम वाढली आहे; परंतु बाजारातील चढ-उतार पाहता जगभरातील विकसित अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर पोहोचत असल्याचे वाटत नाही. कच्च्या तेलाच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यानुसार जागतिक आर्थिक वृद्धीचे नव्याने आकलन केले जात आहे.