Join us  

इंधन जीएसटीखाली आणण्याचा प्रस्ताव नाही - ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 7:28 AM

पेट्राेलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी काय उपाययाेजना केल्या आहेत, तसेच पेट्राेल आणि डिझेलला ‘जीएसटी’च्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार आहे का, याबाबत वायएसआर काँग्रेस, काँग्रेस, जेडीयूसह इतर विराेधकांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले.

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलच्या किमतीवरील करकपातीचा प्रश्न केंद्र सरकारने राज्य सरकारकडे टाेलविला आहे. काेणत्याही राज्याने पेट्राेलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत प्रस्ताव दिलेला नाही, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लाेकसभेत दिली. पेट्राेलियम पदार्थांच्या भडकलेल्या किमतीवरून विराेधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भातील प्रश्नाेत्तरादरम्यान ठाकूर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.  (No proposal to bring fuel under GST - Thakur)

पेट्राेलियम पदार्थांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी काय उपाययाेजना केल्या आहेत, तसेच पेट्राेल आणि डिझेलला ‘जीएसटी’च्या कक्षेत आणण्याचा सरकारचा विचार आहे का, याबाबत वायएसआर काँग्रेस, काँग्रेस, जेडीयूसह इतर विराेधकांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. त्यावर उत्तर देताना ठाकूर यांनी सांगितले की, पेट्राेल आणि डिझेलवर काही कर राज्य सरकारकडून आकारले जातात तर, काही कर केंद्र सरकार आकारते.

टॅग्स :पेट्रोलअनुराग ठाकुर