Join us  

घरचे नकाे, बाहेरचेच जेवण हवे! लाेकांच्या बदलल्या सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 7:20 AM

लाेकांच्या बदलल्या सवयी, दशकभरात बजेटमध्ये माेठा बदल

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या दशकभरात भारतीयांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. लाेक घरी जेवण बनवून  खाण्यापेक्षा बाहेरच्या तयार खाद्यपदार्थांवर जास्त खर्च करू लागले आहेत. सरकारी सर्वेक्षणातून ही बाब समाेर आली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने हे सर्वेक्षण केले आहे. लाेकांचा पॅकबंद खाण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे घरासाठी जिन्नस खरेदीच्या तुलनेत लाेकांनी आपल्या बजेटच्या तुलनेत प्रचंड खर्च पॅकबंद खाद्यपदार्थांवर केला आहे. लाेकांचा किरणा, भाजीपाला इत्यादींवरील खर्च दशकभरात सुमारे एक टक्का घटला आहे.

किरणा बजेट असे बदललेपदार्थ    २०१२     २०२३प्रक्रिया केलेल अन्न    ९%     १०.५%दूध, दुग्धजन्य पदार्थ    ७%     ७.२%धान्य    ६.६%     ४.५%भाजीपाला    ४.६%     ३.८%डाळी    १.९%      १.२%साखर, मीठ    १.२%      ०.६%

५०  टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पॅकबंद पदार्थ, रेस्टाॅरंटमध्ये खाणे आणि फूड डिलिव्हरीवर केला आर्थिक वर्ष २०२३मध्ये.४१  टक्के हा खर्च हाेता १० वर्षांपूर्वी.९७१  रुपये प्रतिव्यक्ती दरमहा खर्च फूड डिलिव्हरीवर शहरी भगात श्रीमंतांनी केला.६०  रुपये प्रतिव्यक्ती खर्च मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबात झाला. 

फूड डिलिव्हरी ॲपच्या वाढत्या विस्तारामुळे लाेकांमध्ये पॅकबंद खाणे मागविण्याचे प्रमाण वाढले आहे, असे सर्वेक्षणात आढळले.

टॅग्स :अन्नहॉटेलअन्न व औषध प्रशासन विभाग