Join us

मनपा आणखी १४०० झाडे फुकट देणाऱ़

By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST

सोलापूर: महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आजवर ३७०० झाडे मोफत देण्यात आली असून, अजून १४०० झाडे मागविण्यात आली आहेत़ ज्या संस्था, शाळा, गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळांना ही झाडे हवी आहेत त्यांनी मनपाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील उद्यान विभागाच्या कार्यालयातून ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन उद्यान अधीक्षक स्वप्नील तारु यांनी केले आहे़ शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मोफत झाडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ राजचंड्री येथून विविध प्रकारचे आणि तीन ते चार वर्षे झालेल्या झाडांची रोपे मागविण्यात येत आहेत़ सध्या आलेल्या १४०० झाडांमध्ये चिकू, जांभूळ, बदाम, आंबा, चिकू, रेनट्री, कदंब वृक्ष, वड, पिंपळ, अशोक आदी झाडांचा समावेश आहे़ नागरिकांनी ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन तारु यांनी केले आहे़