Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर घेरणार - नितीन राऊत ८ डिसेंबरला काँग्रेसचा नागपूर अधिवेशनावर मोर्चा

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

अकोला : सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे. १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची झळ राज्यातील जनतेला बसली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे; परंतु राज्य शासन ढिम्म आहे. आर्थिक मदतीची घोषणा केली जात नाही. या नाकर्ते सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या ८ डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, या मोर्चाचे संयोजक माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित मोर्चाची माहिती देण्यासाठी नितीन राऊत सोमवारी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मोर्चाचे स्वरूप स्पष्ट केले. मोर्चा ८ डिसेंबरला पवित्र दीक्षाभूमीवरून सुरू होईल. रामदासपेठ, लोकमत चौक, बर्डी, व्हेरायटी चौक मार्गे मोर्चा विधिमंडळावर धडकणार आहे. यावेळी जाहीर सभादेखील होणार आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश या मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे राज्यातील सर्व नेतेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात १ लाख लोक सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे आव आणणार्‍या या सरकारला आम्ही शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा जाब विचारणार आहोत. शेतकर्‍यांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी लावून धरणार असून, जवखेडा येथील दलित हत्याकांडाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, असंवैधानिक मार्गाने सरकार चालविणार्‍यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव प्राप्त करावा, अकोला जिल्‘ातील विविध समस्या निकाली काढाव्या, या देखील मागण्या आम्ही करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी मंत्री अजहर हुसेन, सुधाकर गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हिदायत पटेल, महानगर अध्यक्ष मदन भरगड, वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, माजी अध्यक्ष बाबाराव विखे, मनपा विरोधी पक्षनेता साजिद पठाण, नगरसेविका उषा विरक, डॉ. सुभाष कोरपे, हेमंत देशमुख, महेंद्रसिंग सलुजा, राजेश भारती आदी उपस्थित होते.
फोटो : ०२ सीटीसीएल ४२