Join us  

नीरव मोदीने थकविला साडेनऊ कोटी मालमत्ता कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 5:33 AM

मोदी याच्या तीन मालमत्तांचा लिलाव करताना पालिकेला आपला थकीत मालमत्ता कर मिळावा, अशी विनंती प्रशासनाने अमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) केली आहे.

मुंबई : साडेनऊ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याच्या मालमत्तेच्या लिलावातून मिळणाºया रकमेवर महापालिकेने दावा केला आहे. मोदी याच्या तीन मालमत्तांचा लिलाव करताना पालिकेला आपला थकीत मालमत्ता कर मिळावा, अशी विनंती प्रशासनाने अमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) केली आहे.सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचे लक्ष्य गाठण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईतील सर्व थकबाकीदारांना कारवाईचा बडगा उगारला आहे. दाखविण्यात येत आहे. या कारवाईमुळे गेल्या आठवड्यात महापालिकेने सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले. या कारवाईअंतर्गत एका विमान कंपनीची दोन हेलिकॉप्टर जप्त करण्यात आली होती. नीरव मोदीने पालिकेचे तब्बल नऊ कोटी ४२ लाख रुपये थकविले आहेत.यापैकी मोदीच्या लोअर परळ येथील पेन्सिुला कॉपोर्रेट पार्क येथील कार्यालयाचा पाच कोटी १४ लाख रुपये मालमत्ता कर थकला आहे. या मालमत्तेवर पालिकेने बुधवारी जप्तीची कारवाई केली आहे. कुर्ला आणि वांद्रे कुर्ला संकुल अशा एकूण तीन व्यावसायिक मालमत्तांचा लिलाव ईडी करेल. या लिलावातून मिळणाºया रकमेवर पालिकेचा दावा सर्वप्रथम असेल, असे पालिका प्रशासनाने ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांना कळवले आहे.

टॅग्स :नीरव मोदी