Join us

निफ्टी विक्रमी पातळीवर; सेन्सेक्स वधारला

By admin | Updated: March 31, 2017 00:23 IST

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारी विक्रमी ९,१७३.७५ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारी विक्रमी ९,१७३.७५ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सही ११६ अंकांनी वाढला.५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी २९.९५ अंकांनी अथवा 0.३३ टक्क्याने वाढून ९,१७३.७५ अंकांवर बंद झाला. निफ्टीचा हा १७ मार्चनंतरचा उच्चांकी बंद ठरला. त्या दिवशी तो ९,१६0.0५ अंकांवर बंद झाला होता. ३0 कंपन्यांचा सेन्सेक्स ११५.९९ अंकांनी अथवा 0.३९ टक्क्याने वाढून २९,६४७.४२ अंकांवर बंद झाला. अदाणी पोर्टस्, एचडीएफसी, भारती एअरटेल, गेल, आरआयएल, विप्रो, सिप्ला, एसबीआय, एल अँड टी यांचे समभाग वाढले. एम अँड एम, हीरो होंडा, मारुती सुझुकी, अशोक लेलँड यांचे समभाग सुधारले.