Join us

एनजीटीच्या आदेशाने हजारो कोटींचा फटका

By admin | Updated: December 13, 2015 22:53 IST

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिल्लीत डिझेल वाहनांना बंदी घालण्याच्या दिलेल्या आदेशानंतर आधीच बुक झालेल्या वाहनांच्या पुरवठ्यावरून गोंधळाची

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिल्लीत डिझेल वाहनांना बंदी घालण्याच्या दिलेल्या आदेशानंतर आधीच बुक झालेल्या वाहनांच्या पुरवठ्यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या हानीची शक्यता व्यक्त होत आहे.ज्या ग्राहकांनी डिझेल वाहनांसाठी आधीच बुकिंग करून काही पैसेही जमा केले आहेत त्यांच्या वाहनांच्या नोंदणीचे व पुरवठ्याचे काय होणार याचा खुलासा सरकारने करावा, असे वाहन कंपन्यांचे म्हणणे आहे. या शिवाय वर्षअखेरच्या विक्रीसाठी येथील अनेक शोरूम्समध्ये पाठविलेल्या वाहनांचेही मोठे नुकसान सोसावे लागेल, असे दिसते. साधारणत: वाहन कंपन्या डिसेंबरमध्ये ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर करतात त्याद्वारे जास्तीत जास्त ग्राहक मिळवता येतील असा हेतू असतो. एनजीटीच्या आदेशाचा तात्काळ परिणाम हा आधीच बुकिंग करून ठेवलेल्या महाग कार्सवर व हजारो डिझेल वाहनांवर होईल. या वाहनांची नोंद आणि पुरवठ्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. एनजीटीच्या आदेशामुळे नेमक्या किती संख्येतील वाहनांवर परिणाम होईल हे समजू शकले नाही. कंपन्या वर्षाच्या शेवटच्या दिवसांत ज्या वाहनांना विकतात ती वाहनेही यामुळे त्यांना विकता येणार नाहीत. यामुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.