नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदी आणि मागणीत जोर नसल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १९० रुपयांनी उतरला. चांदीला मात्र ३०० रुपयांनी झळाळी चढली.जागतिक बाजारातील कमकुवत कलामुळे सोन्यातील तेजी लोप पावली. तथापि, औद्योगिक क्षेत्र आणि नाणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी खरेदी केल्याने चांदीचा भाव दिल्ली सराफा बाजारात ३०० रुपयांनी वधारत प्रति किलो ३५,३०० रुपयांवर गेला. सोने मात्र १९० रुपयांनी घसरत प्रति दहा ग्रॅम २६,८१० रुपयांवर आले. सिंगापूरमध्येही सोन्याचा भाव ०.१ टक्क्यांनी कमी होत प्रति औंस १.१३२.९७ डॉलरवर होता.
सलग दुसऱ्या दिवशी सोने उतरले
By admin | Updated: September 3, 2015 22:02 IST