Join us

टाटा मोटर्स आणणार दरवर्षी नवीन वाहन

By admin | Updated: July 5, 2014 05:45 IST

टाटा मोटर्सने २०२० पर्यंत दरवर्षी काही नवीन मॉडेल बाजारात सादर करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारतीय कार बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने कंपनीद्वारे हा निर्णय घेण्यात आला.

गुडगाव : टाटा मोटर्सने २०२० पर्यंत दरवर्षी काही नवीन मॉडेल बाजारात सादर करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. भारतीय कार बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने कंपनीद्वारे हा निर्णय घेण्यात आला.टाटा मोटर्सचे अध्यक्ष रणजित यादव (प्रवासी वाहन) यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी काही नवीन वाहने बाजार उतरवण्याची आमची योजना आहे. गेल्यावर्षीपासून आम्ही या धोरणाच्या अनुषंगाने काम करीत आहोत. नवी वाहने केवळ भारतीय बाजारपेठेतच उतरवली जाणार नाहीत, तर जगभरात सादर केली जातील. तथापि, नव्या वाहनांबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही.कंपनी सध्या कारखान्यांची गुणवत्ता सुधारणे तथा ग्राहकांच्या विक्रीनंतर सेवांची उपलब्ध देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. कंपनीने आपल्या नवीन १.२ लिटर पेट्रोल इंजिनच्या प्रचार- प्रसारासाठी देशभरात अभियान सुरू केले आहे. आगामी काळात सादर केल्या जाणाऱ्या जेस्ट आणि बोल्ड या मॉडेलमध्ये या इंजिनचा वापर केला जाणार आहे. (वृत्तसंस्था)