Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत नवे नियम

By admin | Updated: January 16, 2017 00:19 IST

नोंदणीकृत कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) नियमांमध्ये सुधारणा केली

नवी दिल्ली-  नोंदणीकृत कंपन्यांच्या विलीनीकरणाबाबत भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) नियमांमध्ये सुधारणा केली असून, समभागधारकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न त्यामधून केला जात आहे.नवीन बदलानुसार एखाद्या खूप मोठ्या अनोंदणीकृत कंपनीला एखाद्या छोट्या कंपनीमध्ये विलीन होऊन आपली नोंदणी करण्याची मुभा असणार नाही. याबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत.अनोंदणीकृत कंपनीला नोंदणीकृत कंपनीमध्ये विलीनीकरणाला तेंव्हाच मान्यता मिळेल जेव्हा नोंदणीकृत कंपनीच्या समभागांची नोंदणी संपूर्ण देशात सुलभपणे व्यवहार होणाऱ्या बाजारात असेल. याशिवाय विलीनीकरणानंतर क्युआयबीचा वाटा एकूण शेअरधारकांच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये.