Join us  

ऑनलाइन कार्डच्या वापराचे नवे नियम ठरणार अडचणीचे; ८२ टक्के ग्राहकांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:55 AM

ग्राहकहितासाठी १ जानेवारीपासून बदलणार आहेत नियम

नवी दिल्ली : ऑनलाईन शॉपिंग करताना डेबिट कार्ड वापरासंदर्भातील काही महत्त्वाचे नियम १ जानेवारीपासून लागू होणार आहेत. ग्राहकांच्या संरक्षणासाठी ही पावले उचलण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) म्हटले आहे. मात्र, नवी पद्धत वापरण्यासाठी त्रासदायक ठरू शकते, असे ग्राहकांचे मत आहे. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी आरबीआयने नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार ऑनलाईन शॉपिंग करताना प्रत्येक वेळी डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा संपूर्ण क्रमांक द्यावा लागणार आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट किंवा ॲपवर त्यांनी वापरलेल्या कार्डची माहिती स्टोअर करण्याचा पर्याय असतो. मात्र, प्रत्येकवेळी कार्ड क्रमांक पुरवावा लागणार आहे.

काय म्हणतो सर्व्हे?

प्रत्येक वेळी पूर्ण माहिती देताना चुकीचे क्रमांक टाकण्याचीही शक्यता असते. ऑनलाईन पेमेंट फेल हाेण्याची भीती ४४ टक्के ग्राहकांना वाटते. तर ही माहिती थर्ड पार्टीच्या हाती पडण्याचीही भीती ४२ टक्के ग्राहकांनी व्यक्त केली आहे. २८ टक्के ग्राहक याऐवजी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडतील.

पर्यायी पद्धत काय?

कार्डची माहिती स्टाेअर करायची असल्यास सीओएफटी ही सुविधा द्यावी लागणार आहे. या यंत्रणेद्वारे कार्डची माहिती साठवून ठेवण्यासाठी ग्राहकांची संमती आवश्यक राहणार आहे. मात्र, या यंत्रणेत वेगळ्या पद्धतीने माहिती अधिक सुरक्षितपणे स्टाेअर केली जाणार आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक