Join us

नवी ‘होंडा क्लिक’ बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:24 IST

होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडियाने ११० सीसी वर्गातील नवीन स्कूटर बाजारात आणली आहे. ‘क्लिक’ असे अनोखे नाव असलेली ही गाडी

मुंबई : होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडियाने ११० सीसी वर्गातील नवीन स्कूटर बाजारात आणली आहे. ‘क्लिक’ असे अनोखे नाव असलेली ही गाडी उत्तम मायलेज देईल, असे कंपनीने म्हटले आहे. या गाडीला कॉम्बी ब्रेक्सही लावण्यात आले आहेत. शिवाय आपल्याकडील खराब रस्त्यांवरही आरामदायी प्रवासाची हमीसुद्धा ही गाडी देते. कंपनीच्या विक्री विभागाचे उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया यांनी सांगितले की, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ही स्कूटर तयार करण्यात आली आहे.