Join us

सेन्सेक्सचा नवा उच्चंक

By admin | Updated: August 20, 2014 01:46 IST

शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी तेजी राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी जवळपास 30 अंकांनी वधारून 26,420.67 अंक या नव्या उंचीवर बंद झाला.

मुंबई : शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी तेजी राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी जवळपास 3क् अंकांनी वधारून 26,42क्.67 अंक या नव्या उंचीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 23 अंकांनी मजबूत होऊन विक्रमी 7,897.5क् अंकावर स्थिरावला. परदेशी भांडवल प्रवाह, कच्च्या तेलाच्या भावातील घसरण आणि जगभरातील शेअर बाजारात तेजीच्या संकेतांमुळे बाजारानेही ही उसळी घेतली.
सकाळी बाजारात मजबूत कल होता. दिवसभरात एकावेळी सेन्सेक्सने 26,53क्.84 अंक आणि निफ्टीने 7,918.55 अंक या विक्रमी पातळीला स्पर्श केला. यानंतर झालेल्या नफेखोरीने तेजीवर काही प्रमाणात अंकुश बसला. तीस शेअरचा सेन्सेक्स दिवसअखेरीस 29.71 अंक वा क्.11 टक्क्यांच्या लाभासह 26,42क्.67 अंकावर बंद झाला. काल 26,39क्.96 अंक या विक्रमी पातळीवर तो बंद झाला होता. सहा दिवसांत सेन्सेक्स 1,क्9क् अंकांनी वधारला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा 5क् शेअर्सचा निफ्टीही 23.25 अंक वा क्.3क् टक्क्यांच्या तेजीसह 7,897.5क् अंक या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.  दिवसभरात एकावेळी निफ्टीने 7,9क्क् या विक्रमी पातळीलाही गवसणी घातली होती. सोमवारी निफ्टी 7,874.25 अंकाच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.  (प्रतिनिधी)
 
4व्यापा:यांच्या मते, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट तेलाच्या किमती 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या चालू वित्तीय खात्यातील तूट आणि महसुली तूट यांचा निपटारा करण्यास मदत होईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे. तसेच ब्रेंट तेलाचे भाव घसरल्याने अनुदानाचे बिलही कमी होण्याची शक्यता आहे.
4जागतिक बाजारातील सकारात्मक धारणोमुळे स्थानिक बाजाराला मोठे पाठबळ मिळाले. आशियामध्ये चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या शेअर बाजारात तेजी नोंदली गेली. सुरुवातीच्या व्यवहारात युरोपीय बाजारही दणक्यात उघडला.