Join us
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच येणार १० रुपयांची नवी चलनी नोट

By admin | Updated: February 14, 2015 00:54 IST

रिझर्व्ह बँकेने लवकरच १० रुपयांची नवी चलनी नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. या नोटेत रुपयाचे प्रतीकात्मक चिन्ह तथा क्रमांकाच्या रकान्यात ‘एन’ अक्षर असेल.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने लवकरच १० रुपयांची नवी चलनी नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. या नोटेत रुपयाचे प्रतीकात्मक चिन्ह तथा क्रमांकाच्या रकान्यात ‘एन’ अक्षर असेल.आरबीआयने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली. पत्रकानुसार, नव्या नोटेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असेल. याचे छपाई वर्ष २०१४ आहे. मध्यवर्ती बँकेच्या मते, नोटेचे उर्वरित डिझाईन ‘महात्मा गांधी शृंखला-२००५’च्या १० रुपयाच्या नोटांप्रमाणेच असणार आहे. यानंतर उर्वरित नोटाही चलनात राहतील. (प्रतिनिधी)