Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आता नवा पीक विमा

By admin | Updated: June 4, 2015 00:57 IST

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अपुऱ्या पावसाचा अंदाज वर्तवताच सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अपुऱ्या पावसाचा अंदाज वर्तवताच सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाचविण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस नवी पीक विमा योजना आणणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी बुधवारी जाहीर केले.मोठ्या प्रमाणात डाळींच्या टंचाईला तोंड देण्यासह भाववाढीला लगाम लावण्यासाठी डाळींची आयात करून देशांतर्गत पुरवठा सुधारण्यावर भर दिला जाणार असून विविध प्रकारच्या डाळींच्या आवश्यकतेबाबत राज्यनिहाय डाटा मागविला जात आहे.अपुऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेता कृषी क्षेत्रात निश्चितच काही समस्या उद्भवणार आहेत. कृषिक्षेत्राची नुकसानी कमीत कमी असावी, एकूणच अर्थव्यवस्थेवरील ताण कमी केला जावा यासाठी धोरणे राबविली जाणार असून त्याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कृषी क्षेत्राच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. सध्या ५८० जिल्ह्णांमध्ये आकस्मिक योजना तयार असून राज्य सरकारे आणि कृषी संशोधन मंडळे परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहेत.अपुऱ्या पावसाची स्थिती पाहता भारतीय कृषी क्षेत्र लवचिक बनले आहे. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा दुष्काळाची स्थिती होती. प्रत्येक जण तणावाखाली होता मात्र आमचे मंत्रालय नुकसान कमी करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. उत्पादनात घट झाली मात्र ती फार मोठी नाही. यापूर्वीच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही परिस्थितीला सामोरे जाऊ, असेही ते म्हणाले. मंगळवारी सुधारित अंदाज वर्तवताना हे प्रमाण आणखी कमी करीत ८८ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्री सामान्यापेक्षा कमी ऐवजी कमीच हा शब्दप्रयोग केला.