Join us

राष्ट्रवादीची उमेदवारी पुन्हा दीपक साळुंखे यांना

By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST

विधानपरिषद निवडणूक: भाजपची उमेदवारी प्रशांत परिचारक यांना मिळण्याची चिन्हे

विधानपरिषद निवडणूक: भाजपची उमेदवारी प्रशांत परिचारक यांना मिळण्याची चिन्हे
सोलापूर: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही जागा वाटाघाटीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आह़े सोमवारी राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे आ़ दीपक साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली़ ते मंगळवारी उमेदवारी अर्ज भरतील़ भाजपकडून अद्याप उमेदवारांचा शोध सुरू असून प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याचे समजत़े
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 9 डिसेंबर ही अंतिम मुदत आह़े ही जागा काँग्रेसला सोडण्याबाबत तसेच उमेदवारी मिळविण्याबाबत दिलीप माने यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती; मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला पुन्हा ही जागा आल्यामुळे दीपक साळुंखे यांनाच पुन्हा उमेदवारी घोषित झाली आह़े त्यामुळे काँग्रेसचे दिलीप माने यांचे स्वप्न धुळीस मिळाले आह़े बंडखोरी करावी, अशी मागणी देखील माजी आमदार माने यांच्याकडे होऊ लागली आहे; मात्र त्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केली आह़े भाजपकडून प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आह़े या निवडणुकीसाठी मनपा, जि़ प़, नगरपालिका सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती असे 398 मतदार या निवडणुकीसाठी आहेत़
जवळपास 30 जणांनी अर्ज नेले आहेत़ या निवडणुकीत अर्थकारण मोठे असते, त्यामुळे ऐनवेळी काहीही होऊ शकते, असा इतिहास आह़े 27 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 30 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे काय होणार याची उत्सुकता लागली आह़े डीसीसी बँक, जिल्?ाचे राजकारण, हेवेदावे यामुळे जिल्?ात या निवडणुकीबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत़