Join us

नैसर्गिक गॅस एप्रिलपासून होणार १0 टक्क्यांनी स्वस्त

By admin | Updated: March 18, 2015 23:21 IST

१० टक्क्यांनी घट होणार असल्याने एक एप्रिलपासून नैसर्गिक गॅसचे दर प्रति एमएमबीटीयू ५.०२ डॉलरवर येतील.

नवी दिल्ली : १० टक्क्यांनी घट होणार असल्याने एक एप्रिलपासून नैसर्गिक गॅसचे दर प्रति एमएमबीटीयू ५.०२ डॉलरवर येतील. दरकपातीमुळे देशांतर्गत नैसर्गिक गॅसचे उत्पादन करणाऱ्या ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. सध्याचा दर प्रति एमएमबीटीयू ५.६१ डॉलर आहे.आंतरराष्ट्रीय बाजारानुसार नैसर्गिक गॅसच्या दरात एप्रिलपासून सुधारणा करण्यात येत आहे. गुणवत्ता (ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू) मूल्यानुसार नैसर्गिक गॅसचा दर ४.६७ प्रति एमएमबीटीयू होईल. सध्या हा दर ५.०५ डॉलर आहे.पुढील सहा महिन्यांसाठी नैसर्गिक गॅसचे दर अमेरिकेतील हेन्री, नॅशनल बॅलेंसिंग पॉइंट (ब्रिटन), अल्बर्टा (कॅनडा) आणि रशियातील दरानुसार ठरविण्यात येणार आहे. यात चालू तिमाहीचा समावेश नसेल. त्याचप्रमाणे १ एप्रिल ते ३० सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत गॅसचा दर जानेवारी ते डिसेंबर २०१४ मधील सरासरी दरानुसार असतील. पेट्रोलियम मंत्रालय नवीन दराची घोषणा चालू आठवड्यात करू शकते, असे सूत्रांनी सांगितले.