चेन्नई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करावे, अशी सूचना पी. जे. नायक समितीने केली आहे. या सूचनेच्या विरोधात देशातील पाच बँक कर्मचारी संघटनांनी २३ मे रोजी देशव्यापी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांचे नेतृत्व करणार्या अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. वेंकटचलम म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा स्थापन केलेल्या पी. जे. नायक समितीने दिलेल्या अहवालाचा आम्ही निषेध करतो. या अहवालात बँकांचे खाजगीकरण व सरकारी वाटा ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वेंकटचलम यांनी हा अहवाल फेटाळून लावण्याची मागणी केली. ते म्हणाले की, या अहवालाच्या विरोधात २३ मे रोजी देशव्यापी आंदोलन केले जाईल. या अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना माहिती अधिकार कायद्यापासून दूर ठेवण्याचीही सूचना करण्यात आली आहे.सार्वजनिक बँकांवरून सरकारचे नियंत्रण हटविण्याची इच्छा या समितीची आहे. बँका खाजगी क्षेत्राकडे सुपूर्द करण्याचा मानस या समितीचा आहे. त्यामुळे या विरोधात २३ मे रोजी मोठ्या प्रमाणात देशभरात विरोध प्रदर्शन केले जाईल. एआयबीईएव्यतिरिक्त अखिल भारतीय बँक अधिकारी संघ, भारतीय बँक कर्मचारी महासंघ, भारतीय राष्ट्रीय बँक कर्मचारी महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय बँक अधिकारी काँग्रेसचाही या आंदोलनात सहभाग राहील. (वृत्तसंस्था)
२३ मे रोजी बँक कर्मचार्यांचे देशव्यापी आंदोलन
By admin | Updated: May 21, 2014 02:26 IST
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करावे, अशी सूचना पी. जे. नायक समितीने केली आहे.
२३ मे रोजी बँक कर्मचार्यांचे देशव्यापी आंदोलन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}