Join us

सराफा व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप चालूच

By admin | Updated: March 10, 2016 03:04 IST

आज सलग आठव्या दिवशीही सराफा व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप चालूच होता. सोने आणि रत्नजडित चांदीच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात

नवी दिल्ली : आज सलग आठव्या दिवशीही सराफा व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप चालूच होता. सोने आणि रत्नजडित चांदीच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. दोन लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावर ग्राहकांना पॅनकार्ड क्रमांक देण्याच्या सक्तीला सराफा व्यापाऱ्यांचा विरोध आहे.आॅल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुमार जैन यांनी सांगितले की, महानगरांसह देशभरातील सराफा दुकाने आठव्या दिवशीही बंद होती. हा प्रस्ताव मागे घेईपर्यंत संप चालूच राहील.